चंदगड / प्रतिनिधी
चंदगड वैश्यवाणी समाजातर्फे लघुरुद्र अभिषेक रवळनाथाला गेल्या 14 वर्षापासून लघु रुद्र अभिषेक केला जातो. रवळनाथ मंदिराचे जे सेवेकरी १२ बलुतेदार असतात त्याचप्रमाणे वैश्य समाजाला सासनकाठी चा मान आहे. चंदगडमधील रवळनाथाची यात्रा झाल्यानंतर पहिल्या मंगळवारी हा लघु रुद्राभिषेक केला जातो. लघुरुद्राभिषेक करण्याचा मान दरवर्षी सौ व श्री ना मिळत असतो. यावर्षी सौ व श्री राजेंद्र गोपाळ बल्लाळ यांना मिळाला आहे. लघुरुद्र अभिषेक करण्याचे कारण गावात सुख:शांती, ऐशवर्य गावातील सर्वलोकाना प्राप्त व्हावे यासाठी आयोजन केले जात असल्याची माहिती वैश्यावाणी समाजाचे अध्यक्ष किरण बांदेकर यांनी चंदगड लाईव्हशी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन साठी जेष्ठ मोहन पिळणकर, रमाकांत भिसे, विजय टोपले,दिलीप पिळणकर ,दिलीप बांदेकर सह तरुण राजू दड्डीकर, सुनील काणेकर सामाजिक कार्यकर्ते,समीर पिळणकर ,मोहन कर्पे, बंडू येडवे,प्रवीण बल्लाळ, वैयभव टोपले,प्रसाद बल्लाळ, किशोर पिळणकर ,उमेश पिळणकर ,सोनू बल्लाळ, जयवंत तेलंग, काणेकर,रुंधन दड्डीकर,सौ सोनाली बल्लाळ, सौ रश्मी पिळणकर, कु. समीक्षा कोरगावकर आदी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment