कोदाळी येथे साडेनऊ लाख रुपये जप्त, निवडणूक पथकाची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2019

कोदाळी येथे साडेनऊ लाख रुपये जप्त, निवडणूक पथकाची कारवाई

संग्रहित छायाचित्र
चंदगड / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोदाळी (ता. चंदगड) येथे निवडणूक विभागाने लावलेल्या पथकाने काल रात्री गोव्याकडून येणाऱ्या वाहनांच्या तपासणी करत असताना एका डस्टर गाडीमध्ये 9 लाख 76 हजार 410 रुपये अशी रक्कम सापडली. निवडणूक आचार संहिता पथक प्रमुख सुनिल कोरवी, सुहास रेडेकर व पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही रक्कम मसाला व्यापाऱ्यांची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याबाबत अधिक चौकशी पोलीस ठाण्यात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ``लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैद्य वस्तूंची वाहतूक होऊ नये. यासाठी कोदाळी (ता. चंदगड) येथे स्टॅटिक पॉईंट नेमला आहे. या ठिकाणी दोडामार्ग-तिलारी घाटातून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या डस्टर गाडी (के. ए. 22,  झेड, 0174) या गाडीला तपासण्यासाठी थांबले असता त्यामध्ये 9 लाख 76 हजार 410 रुपये आढळून आले. पथक प्रमुख सुनिल कोरवी यांनी बाबतची माहिती अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विनोद रणावरे यांना कळवली. रात्री तपासणीसाठी गाडीसह चालक के. पवनकुमार (रा. बेळगाव) यांच्यासोबत मालक मल्लीकर्जून यांना चंदगड पोलिसात आणण्यात आले. या ठिकाणी अधिक चौकशी केली असता हे मसाले व्यापारी असून आपली उधारी गोवा येथून वसुली करून  येताना कोदाळी नाक्यावर त्यांना अडवण्यात आले. यावेळी तपासणी केली असता ही रक्कम आढळून आली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक पी.  बी. कदम यांच्याशी संपर्क साधला असता प्रथमदर्शनी ही रक्कम मसाल्याच्या उधारीची वाटते, असे सांगण्यात आले. पण याबाबत खोलवर तपास केल्यानंतरच अधिक माहिती उघडकीस येईल असे सांगितले. 


1 comment:

Unknown said...

बोंबला आता. मेला तो व्यापारी

Post a Comment