फाटकवाडी धरणातून उतारावरील गावांना पाणीपुरवठा करण्याची उत्कर्ष फाऊंडेशनची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2019

फाटकवाडी धरणातून उतारावरील गावांना पाणीपुरवठा करण्याची उत्कर्ष फाऊंडेशनची मागणी


तेऊरवाडी / प्रतिनिधी
फाटकवाडी (ता. चंदगड) येथील धरणातून तालुक्यामधे डोंगर उतारावर असणाऱ्या गावाना सायफन पद्धतीने पाणी परवठा करावा, अशी मागणी मलतवाडी येथील उत्कर्ष फौडेशनने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, भौगोलिकदृष्ट्या विचार करता फाटकवाडी धरणाच्या काही अंतरावर चाळोबा व गंधर्वगड आहे. याच डोंगर उतारावर पिळणी, भोगोली, सावर्डे, गवसे, कोरज, वरगाव, गुडेवाडी, सातवणे, मुगळी, लाकुरवाडी, मलतवाडी अशी अनेक गावे आहेत. या गावांच्यापासून नदी लांब अंतरावर आहेत. त्यामुळे या गावांना शेती पिकासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. नदीवरून पाणी आणणे खूपच खर्चिक आहे. या ठिकाणी राबवलेल्या सहकारी तत्वावरील पाणी उपसा संस्थाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे वरील गावातील शेती ओलिताखाली आणण्यासाठी फाटकवाडी प्रकल्पातून सायफन पद्धतीने अथवा पाट पध्दतीने पाणीपुरवठा करावा अशी मागणी फौंडेशनच्या वतीने निवेदनातून केली आहे. 

No comments:

Post a Comment