साक्षी जयवंत शिंदे |
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत 26 मार्च 2019 रोजी घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रीय प्राथमिक शाळा नांदवडे (ता. चंदगड) या शाळेची सातवीमध्ये शिकणारी विद्यार्थ्यींनी कुमारी साक्षी जयवंत शिंदे हिने 200 पैकी 154 गुण मिळवून तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. यापूर्वीही या विद्यार्थीनीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. तिला वर्गशिक्षक शिवाजी पाटील, मार्गदर्शक बाबुराव गावडे, मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी, केंद्रप्रमुख सुभाष सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते या विद्यार्थिनीचा गौरव होणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशराम पवार यांनी तिचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment