![]() |
मागणीचे निवेदन देताना राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ॲग्रोचे कर्मचारी. |
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ॲग्रो इंडिया लिमिटेड या कंपनीचे कामगार व अधिकारी यांना एका संघटनेच्या प्रमुखासह त्यांच्या साथीदारांनी कारखान्यावर येवून असभ्य व उर्मट वर्तवणुक केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे व पोलिस निरिक्षक एस. एम. यादव यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 27 मार्च 2019 रोजी संघटना प्रमुख काही साथीदारासह कारखान्यावर येऊन असभ्य व उर्मट वर्तणुकीची भाषा बोलून त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे कारखान्याची व व्यवस्थापनाची नाहक बदनामी झाली. या घटनेच्या वेळी कामगारांसमोर संबंधित व्यक्ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. अधिकारी ऐकून घेत होते व तो कारखान्यावर चुकीचे व नाहक आरोप करत होता. ते कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी या कारखान्यावर अवलंबून असणारे सर्व घटक अडचणीत येतील व आम्हा कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. एका संघटनेच्या प्रमुखासह त्यांच्या साथीदारांनी शांतता व सुव्यवस्था बिघडली असून हे कारखान्याच्या गेटवरून निघताना धमकीची भाषा बोलत होते. तरी संबंधितांवर योग्य कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व कामगार आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदन कामगारांनी चंदगड तहसीलदार व चंदगड पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. निवेदनावर आनंदा कुंभार, फतेसिंग सरदेसाई, चंद्रकांत कुंभार, संदिप देसाई, बाळु पाटील, अनिल पाटील, मोहन नुलेकर, विलास शिंदोळकर, चंबाना देशनुर, राचमंद्र नाईक, बसरवराज चाळुमहाराज, नामदेव पाटील व अभिजित शिवनगेकर यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment