![]() |
दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र |
दौलत चालवणेसाठी जिल्हा बॅंकेशी झालेल्या करारानूसार तालूका संघाने 30 मार्च 2019 रोजी पैसे भरल्यास अथर्व कंपनी जिल्हा बँकेशी झालेले करार पत्र तालुका संघाला देऊन स्वतः माघार घेणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी हलकर्णी (ता. चंदगड) येथील गणेश मंदिरामध्ये शनिवारी 30 मार्च 2019 रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला तालुक्यातील शेतकरी, कामगार सर्व पक्षीय कार्यकर्ते दौलत सर्व सभासद संचालक यांनी हजर रहावे असे आवाहन दौलत बचाव समितीचे अध्यक्ष अॅड. संतोष मळविकर यांनी केले आहे. यावेळी अथर्व कंपनीचे मानसिंग खोराटे उपस्थित राहणार आहेत. पण जर तालुका संघाने पैसे भरले नाहीत व अथर्व कंपनीने माघार घेतल्यास चंदगड तालुक्यातील जनतेचा, शेतकरी वर्ग व कामगारांच्या विश्वास घाताला तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील जबाबदार राहतील असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment