आशा उबाळे यांची बेळेभाट प्राथमिक शाळेला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2019

आशा उबाळे यांची बेळेभाट प्राथमिक शाळेला भेट

बेळेभाट (ता. चंदगड) येथे शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले.
चंदगड / प्रतिनिधी
बेळेभाट (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर शाळेला शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी भेट दिली. शाळेतील शैक्षणिक साधने व त्यांचा होत असलेल्या उपयोग, शाळा परिसर, डिजिटल वर्ग व पर्यावरण पार्क इत्यादीची पाहणी करुन  समाधान व्यक्त केले. चंदगड तालुक्यातील छोट्याशा बेळेभाट गावातील ही सम्रुध्द शाळा नक्कीच कौतुकास पात्र आहे. शाळा सुधारणा घडवून आणण्यासाठी गावाचे योगदान मोलाचे आहे. त्यावेळी त्यांनी शाळा तसेच ग्रामस्थांचे तोंडभरून कौतुक केले. केंद्रप्रमुख एम. टी. कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष नितीन पाटील व सर्व सदस्यांचेही कौतुक केले. अध्यापिका सौ. मनिषा गावडे यांनी शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार केला. सदिच्छा भेटीच्या वेळी गटशिक्षणाधिकारी सौ. सभेदार, केंद्रप्रमुख सावंत, श्री. कोळी  ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment