चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सर्व अपंग, अंध, विधवा, परित्यक्त्या यांनी लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केल्याने मतदान करताना "नोटा"या बटणाचा वापर करून राजकीय पक्षांना संघटनेची ताकद दाखवण्याची ठरविले आहेत. याबाबतचे निवेदन प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष जोतिबा गोरल यांनी प्रसिध्दिला दिले आहे.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन ही एक सामाजिक संघटना असुन या माध्यमातून समाजातील अनेक अपंगांच्या समस्या, शासकीय योजना, सवलती मिळवून देण्याचे काम तालुक्यात करत आहे. केवळ मतदान पुरता हा निर्णय आहे. मात्र राजकीय पक्ष अपंग बांधवांचा विचार करत नाही. देशातील लोकसंख्येत सुमारे वीस टक्के अपंगाची संख्या आहे. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात निराधार, अंध-अपंगाचा कोठेही उल्लेख आढळत नाही. याचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे. आपल्याकडे राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व अपंग अंध,परित्यक्त्या, शेत मजूर, भुमिहीन परिवारांनी या निवडणूकीत मतदान करताना मतदान मशिनच्या शेवटी असलेल्या "नोटा ' या बटणाचा वापर करून सर्व उमेदवारांना आपली ताकत दाखवण्याचे आवाहान प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनाच्या वतीने प्रसिद्धीला देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment