![]() |
अपघातग्रस्थ तवेरा गाडी व जखमिना मदत करणारे प्रवाशी. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर महामार्गावर आज सायंकाळी सहा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र 4 वर निपाणी येथे तवंदी घाटाजवळ तवेरा (DN-09, G-0486) या गाडीला भिषण अपघात झाला. दुर्देवाने या अपघातात घटनास्थळी एका बालकाचा मृत्यू झाला तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी अपघातग्रस्तांचे फोटो काढत न बसता येथून जाणाऱ्या चंदगड तालुक्यातील माध्यमिक शिक्षकानी मदतीचा हात देवून माणूसकी दर्शन घडविले.
कोठेही अपघात झाला की मदतीपेक्षा सेल्फी आणि फोटो, व्हीडीओ सोशल मेडियावर टाकण्याची चढाओढ चालू असते. पण या सर्वाला चंदगडच्या माध्यमिक शिक्षकानी फाटा देवून माणुसकिचे दर्शन घडवले. यामध्ये चंदगड लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधीसृद्धा सहभागी होऊन जखमिना मदतीचा हात दिला. कोल्हापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या तवेरा गाडीला तवंदी घाटानजीक भिषण अपघात झाला. याचवेळी चंदगड तालुक्यातील माध्यमिक शिक्षक कोल्हापूर येथे निवडणूकीचे प्रशिक्षण पूर्ण करून चंदगडकडे जात होते. याचवेळी भिषण अपघात झाल्याने गोंधळ उडाला. घटनास्थळी अपघातातील जखमीना मदत करण्याऐवजी काही जण फोटो काढण्यात मग्न होते. यावेळी येथे आलेल्या शिक्षकांनी फोटो काढणाऱ्यांना कानपिचक्या देवून जखमींना रुग्णवाहिकेमध्ये चढवण्यामध्ये मदत केली. तर काहीनी धीर दिला. चंदगड लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी संजय पाटील यांनी जखमींना पाणी देवून अपघातग्रस्थाना आधार दिला. दुर्देवाने या आघातात घटनास्थळी एका बालकाचा मृत्यू झाला तर अन्य आठ जन गंभीर जखमी झाले आहेत. तरीही घटनास्थळी केवळ बघ्याची भूमिका न घेता अपघातग्रस्थाच्या मदतीला धावून जाणाऱ्या चंदगडच्या माध्यमिक शिक्षकांच्या माणूसकीची
दर्शन घडविल्याने आजही माणुसकी जीवंत असल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment