मोदींनी आपले जीवन देशाला समर्पित केले – आमदार सुरेश हाळवणकर - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2019

मोदींनी आपले जीवन देशाला समर्पित केले – आमदार सुरेश हाळवणकर

हलकर्णी (ता. चंदगड) येथे भापजच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश हाळवणकर. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळी.
चंदगड / प्रतिनिधी
दौलत सुरु होणे काळाजी गरज असून त्यासाठी लागेल ती मदत करणार आहे. शेतकऱ्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी आचारसंहितेनंतर महसुलमंत्र्यांशी चर्चा करुन येतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे. भाजपने सात महिन्यात तेरा कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस पोहोचविले. देशाला संरक्षण व्यवस्थेत बलशाली बनविले. देशात 277 सॅटेलाईट अंतराळात सोडले. जगात चौथ्या क्रमांकावर देश पोहोचविला. शेतीमालाला योग्य भाव मिळवून दिला. मोदींनी आपले जीवन देशाला समर्पित केले आहे. खाणार नाही, खाऊ देणार नाही. मोदींच्या या धोरणामुळे आज मोदींच्या विरोधात छप्पन पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे त्याचे हात बळकट करण्यासाठी मोदींना पाठबळ देण्याची गरज आहे. असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. 
तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अजय चौगुले यांनी केले. पाशा पटेल म्हणाले, ``काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्यावर झालेले अन्याय त्यांच्या शेतीमालाला व त्यांच्या अडीअडचणींना कोणतीच दाद दिली नाही. पण भाजप सरकारने पिक योजना, जलयुक्त शिवार, पाणंद रस्ते, अशा विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणली आहे.`` गोपाळराव पाटील म्हणाले, ``यापूर्वी आमचा केवळ राजकारणापुरता वापर झाला आहे. दौलत कारखाना अडचणीत येण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. केवळ गोपाळराव अडचणीत यावे, हा एकमेव अजेंडा विरोधकांनी आखला. दौलतचे राजकारण केले. आम्ही खूप कंपन्यांना विनवणी करुन दौलत सुरु व्हावा, दौलत वाचावा व कामगारांना न्याय मिळावा या भावनेतून पाठपुरावा केला. पण काही विघ्नसंतोषी लोकांनी विविध कंपन्या पळवून लावल्या व स्वत:चे राजकारण अबाधित ठेवले. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. माझ्या प्रामाणिकपणामुळेच भाजप पक्षानेही मला राज्य कार्यकारणी सदस्यपद दिले. संजय मंडलिक यांना चंदगड तालुक्यातून उचांकी मतदान देणार असल्याचेही सांगितले.`` 
विरेंद्र मंडलिक म्हणाले, ``उमेदवार संजय मंडलिक यांनी जि. प. व पं. स. च्या माध्यमातून अनेक कामे केल आहेत. शैक्षणिक, सहकार व अन्य क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान आहे. त्यामुळे यापुढील कार्यासाठी त्यांना जास्तीत-जास्त मतदान करुन दिल्लीला पाठवावे. चंदगड मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले होते. ते आताही मिळेल यात शंका नाही. चंदगडकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पुढील काळात प्रयत्नशील राहु.`` यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे गावोगावी जाऊन प्रचार यंत्रणा राबवत असून शिवसैनिक पायाला भिंगरी लावून फिरत असल्याने यावेळी विजय निश्चित असल्याचे सांगितले. मेळाव्याला प्रभाकर खांडकेर, संग्राम कुपकेर, सुनिल शिंत्रे, ॲड. हेमंत कोलेकर, अशोक चराटी, अशोक जाधव, संजय पाटील, बाबा देसाई,  शांता जाधव, संज्योती मळविकर, भरमाणा गावडा, गोपाळ ओऊळकर, भावकु गुरव, संदिप नांदवडे, समीर पिळणकर, चेतन बांदिवडेकर, राजू पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment