कर्नाटक बोर्डाच्या परीक्षेत चंदगडच्या विद्यार्थ्यांचा झेंडा - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2019

कर्नाटक बोर्डाच्या परीक्षेत चंदगडच्या विद्यार्थ्यांचा झेंडा


चंदगड  / प्रतिनिधी
बारावीच्या बेळगाव कर्नाटक बोर्डाच्या परीक्षेत चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यींनीनी झेंडा रोवण्यात यश मिळवले आहे. बेळगावात शिकत असलेले चंदगडच्या विद्यार्थ्यांनी सायन्स विभागात यश मिळवले आहे. प्रथमेश किरण शेरेगार (चंदगड) यांनी ८७% गुण मिळवून ज्योती कॉलेज, बेळगाव येथे तिसरा क्रमांक पटकावला, भक्ती सतीश सबनीस (चंदगड) हिने ८२% गुण मिळवून जी. एस. एस. कॉलेज बेळगाव येथे उत्तीर्ण व आशुतोष चिदंबर जोशी (दाटे ) बारावी सायन्स बेळगाव जे एस एस कॉलेज येथे 93.16 % गुण  मिळविले. रचना रवी गडकरी (चंदगड) ७५% गुण मिळऴून जी. एस. एस. कॉलेज बेळगाव येथे उत्तीर्ण झाली आहे. तर कॉमर्स विभागात समृद्धी दीपक चव्हाण (८८.८ % लिंगराज कॉलेज बेळगाव)  या सर्व विद्यार्थ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चंदगड येथे झाले आहे. यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीचे चंदगड व परिसरातून कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment