चंदगड / प्रतिनिधी
मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथे रहाते घरी कोणत्यातरी विचाराने रहाते घराच्या बाहेरील सोफ्यात असलेल्या आडव्या वाशाला दोरीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. नारायण सुभाना जाधव (वय-72, रा. मुरकुटेवाडी, ता. चंदगड) असे मयताचे नाव आहे. आज दुपारी साडेबारा ते अडीज या दरम्यान हि घटना घडली. मुलगा भावकू नारायण जाधव यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. ना. एम. जी. पोवार तपास करीत आहेत.


No comments:
Post a Comment