चंदगड नगरपंचायतीसाठी 4 जूनला मुंबई येथे नगराध्यक्ष आरक्षण सोडत - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी 4 जूनला मुंबई येथे नगराध्यक्ष आरक्षण सोडत

चंदगड नगरपंचायत
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड व हातकणंगले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत 4 जून 2019 रोजी दुपारी 3 वाजता राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री दालन, पाचवा मजला, विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिली. या नगराध्यक्ष आरक्षण सोडतीसाठी संबंधित नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येकी दहा लोकप्रतिनिधींनी या सोडतेवेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment