बेळगावच्या कलाकाराकडून मोदींना रांगोळीतून शुभेच्छा - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2019

बेळगावच्या कलाकाराकडून मोदींना रांगोळीतून शुभेच्छा

वडगाव- बेळगाव येथील अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून रेखाटलेली नरेंद्र मोदी यांची आकर्षक रांगोळी प्रतिमा
कालकुंद्री / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करून सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्याबद्दल वडगाव- बेळगाव येथील अजित महादेव औरवाडकर या कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रांगोळीतील प्रतिमा रेखाटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ही कलाकृती पाहण्यासाठी त्यांच्या नाझर कँप वडगाव येथील निवासस्थानी कलाप्रेमी नागरिकांसह भाजप समर्थकांनी गर्दी केली आहे. 
कलाकार अजित औरवाडकर यांनी रेखाटलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आकर्षक रांगोळी.
अजित औरवाडकर हे उत्कृष्ट चित्रकार तसेच छायाचित्रकार आहेत. विविध प्रसंगी त्यांनी रांगोळीतून रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई, डॉ. राधाकृष्णन, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, ए. पी. जे. अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, शहनाईवादक बिस्मिल्ला खान, लेफ्टनंट कर्नल रणवीर सिंग, युसुफझाई मलाला आदींसह संगीत, नाट्य, क्रीडा व देशभक्तांच्या रेखाटलेल्या कलाकृतींना कलाप्रेमी रसिक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. एक कलाकार म्हणून सितार वादक पंडित रविशंकर यांना रांगोळीतून प्रतिमा रेखाटून वाहिलेली आदरांजली ही त्यांची पहिली कलाकृती. कलेच्या माध्यमातून सर्वांना आनंद देण्याचे  अजित औरवाडकर यांचे कार्य निश्चितच अनुकरणीय आहे.

No comments:

Post a Comment