चंदगड शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची तहसिलदारांच्याकडे निवेदनातून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2019

चंदगड शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची तहसिलदारांच्याकडे निवेदनातून मागणी

चंदगड शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करावा या मागणीचे निवेदन देताना जिल्हा भाजपा (ग्रामीण)चे उपाध्यक्ष समीर पिळणकर व इतर सहकारी
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहराला नदीचे पाणी थेट पिण्यासाठी सोडले जाते. ते पाणी अशुध्द असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे चंदगड शहराला पिण्यासाठी फिल्टर केले स्वच्छ पाणी पुरविण्यात यावे अशी मागणी जिल्हा भाजपा (ग्रामीण)चे उपाध्यक्ष समीर पिळणकर यांनी चंदगड तहसीलदारांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.                                
निवेदनात म्हटले आहे की, ``गेल्या पंचवीस वर्षे मागे चंदगडला सुरु करण्यात आलेल्या नळपाणी योजनेसाठी वापरण्यात आलेल्या पाईपलाईनचा उपयोग अलीकडील शाश्वत पाणी योजनेत केला आहे. या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. तसेच पाणी शुद्धीकरण न करता घटप्रभा नदीचे पाणी थेट पुरवले जात आहे. दशका पासून हा प्रकार कायम आहे. शुद्धीकरण नसल्याने शहरातील नागरिकांना साथीच्या आजाराशी सामना करावा लागत आहे. या महिन्यात मोठ्या प्रमाणात काविळच्या आजाराला वीस-पंचवीस लहान-थोरांना सामोरी जावे लागेल. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य वरचेवर बिघडत आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन भाजपचे युवा(ग्रामीण)जिल्हा उपाध्यक्ष समीर पिळणकर यांनी निवेदनातून केली आहे. 

No comments:

Post a Comment