गजानन पाटीलची सांख्यिकी अधिकारीपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2019

गजानन पाटीलची सांख्यिकी अधिकारीपदी निवड

गजानन पाटील
चंदगड / प्रतिनिधी
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील गजानन गावडू पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून सांख्यिकी अधिकारीपदी निवड झाली आहे. गजानन सद्या शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात संशोधन करित आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण कडलगे येथे झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झाले आहे. त्याला प्रा. डॉ. ए. व्ही. दोरुगडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

No comments:

Post a Comment