तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे पॉलिटेक्निक कॉलेजला बीफार्मसीची मंजुरी - महादेवराव वांद्रे - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2019

तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे पॉलिटेक्निक कॉलेजला बीफार्मसीची मंजुरी - महादेवराव वांद्रे

चंदगड येथे पत्रकार परिषदेत तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे पॉलिटेक्निक कॉलेजला बीफार्मसीची मंजुरी दिल्याची माहीती देताना अध्यक्ष महादेवराव वांद्रे, मोहन परब, उमर पाटील.
चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे पॉलिटेक्निकल कॉलेजला बीफार्मसीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महादेव वांद्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तुर्केवाडी येथे कॉलेजच्या कार्यालयात त्यांनी या अभ्यासक्रमाच्या मंजुरीबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याच्या हेतूने पॉलिटेक्निकल कॉलेज सुरु केले. त्यामुळे ग्रामीण भागीतील विद्यार्थ्यांना गावा शेजारी शिक्षण घेणे शक्य झाले. आर्थिक भार कमी झाल्यामुळे गोरगरिबांची मुले इंजिनिअर झाली. अशाच पद्धतीने औषध कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असल्यामुळे कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाने शासनाकडे बी फार्मसी या अभ्यासक्रमाची मागणी केली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून त्याला सुरवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर ओषध निर्माण कंपनीमध्ये, फार्मासिटीकल मार्केटिंग, क्वालिटी कंट्रोल आदीसाठी संधी आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संचालक मोहन परब, उमरफारुख पाटील उपस्थित होते.


No comments:

Post a Comment