रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा बद्धल कोल्हापूर पोलिस ठाण्यात सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2019

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा बद्धल कोल्हापूर पोलिस ठाण्यात सत्कार

कोल्हापूर येथे पोलीस निरीक्षक संजय मोरे, शाहूपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर जमीर यांचा सत्कार करतांना.
चंंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर येथील  प्राची मिलिंद मांगलेकर, (वय 38 वर्ष)  या दिनांक 30 5 2019 रोजी सकाळी 9:50 वाजताच्या सुमारास रिक्षामध्ये बसून कोल्हापूर येथील नंदादीप हॉस्पिटल ते मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी प्रवास करून रिक्षातून उतरून गेल्यानंतर त्यांची 15000 रोख व दवाखान्याचे, स्वतःची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षामध्ये विसरून राहिली होती. ती बॅग कागदपत्रातील पत्त्यावरून रिक्षाचालक जमीर रशीद मुल्ला (वय 40, रा. लिशा हॉटेल शेजारी, नम्रता घरकुल, कोल्हापूर) या रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवून प्राची मांगलेकर यांना शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये बोलावून रिक्षात विसरलेले सर्व परत केले. जमीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शाहूपुरी पोलिस ठाण्यातर्फे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पोलिसां समक्ष त्यांनी सदरची मौल्यवान कागदपत्रे व रोख रक्कम असलेली बॅग प्रवासी महिलाला परत केल्याबद्धल  त्यांचे  प्राची मांगलेकर यांनी विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment