![]() |
इंदोर येथे दिव्यांगाच्या थाळीफेक आणि गोळाफेकमध्ये यश मिळविलेले सौ. कमल कोरे व निखिल कडगांवकर.
|
मध्य प्रदेशातील इंदोर येथे नुकताच पार पडलेल्या दीव्यांग स्पोर्ट फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या थाळीफेक आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारात चंदगड तालुक्यातील दोन स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले. महिला (मोठ्या गटात) सौ. कमल अनिल कोरे (चंदगड) यांनी थाळीफेक व गोळाफेक या दोन्ही स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. पुरुष (मोठ्या गटात) निखिल कडगांवकर यांनीही थाळीफेक व गोळाफेक या प्रकारच्या खेळात प्रथम क्रमांक पटकावला. दिव्यांगाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चंदगड तालुक्यातील या दोन्ही खेळाडूंचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment