नुल येथे रमजानिमित्त मुस्लिम बांधवांना रेडेकर यांनी दिल्या शुभेच्छा - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2019

नुल येथे रमजानिमित्त मुस्लिम बांधवांना रेडेकर यांनी दिल्या शुभेच्छा

नुल (ता. गडहिंग्लज) येथे अनिरुद्ध रेडेकर यांनी मुस्लिम बांधवांची सदिच्छा भेट घेवून रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
चंदगड  / प्रतिनिधी
कै. केदारी रेडेकर शिक्षण समुहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांनी नुकताच नुल (ता. गडहिंग्लज) येथील  मुस्लिम समाजाला सदिच्छा भेट देऊन रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. रोजे सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. तसेच गावामधील 12 वी मधील परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारी विद्यार्थिनी अश्विनी धोंडीराम चव्हाण या विद्यार्थिनींच्या घरी भेट देवून भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. स्पर्धा व परीक्षांकडे जास्त लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले. यावेळी रेडेकर यांच्या समवेत शिवसेना चंदगड विधानसभेचे संपर्कप्रमुख अशोकजी निकम,  हातकणंगले लोकसभा युवासेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, डॉ. स्वप्निल चव्हाण,  युवराज बरगे, शिवशाहु प्रतिष्ठान मुंबईचे सचिव कृष्णा पाटील, नामदेव पाटील, चांगभलं सेवासंस्था, दिवाचे विठ्ठलराव घेवडे, संदिप शेलार, बादशहा मुल्ला, तौसिफ बुडैन्नावर, राजवर्धन यादव, विजय चव्हाण, शह्हाजहान सनदी व अजहर मुल्ला इत्यादी उपस्थित होते.No comments:

Post a Comment