साके येथील संदिप लोहार यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2019

साके येथील संदिप लोहार यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची मागणी

हल्लेखोरावर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देताना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मले व पदाधिकारी.
कागल / भाऊसाहेब सकट
साके (ता. कागल) येथील संदिप मधुकर लोहार यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणा-या  बाळासो लोहार याचेवर  प्राणघातक हल्ला कलम लावून कायदेशीर कारवाई करणेबाबतचे लेखी निवेदन कागल पोलीस ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.
निवेदनचा आशय असा की, आमच्या पत्रकार संघाचे कागल तालुका कार्याध्यक्ष साके ता.कागल येथील सागर मधुकर लोहार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने  सोमवार दि. 20 मे 2019 रोजी रात्री 10 वाजता बाळासो हिंदूराव लोहार व त्यांची पत्नी अश्विणी लोहार आले. मात्र सागर लोहार बाहेर गावी गेल्यामुळे ते घरी नव्हते. त्यावेळी त्यांचे भाऊ संदिप लोहार यांनी घराचा दरवाजा उघडताच त्यांच्यावर बाळासो लोहार याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. संदिपने तो चुकवला त्यामध्ये त्यांच्या डाव्य़ा कानावर कोयत्याचा जबर वार बसला.यामध्ये संदिप लोहार यांचा कान तुटला.या वाराने जखमी झाल्याने त्यांना तात्काळ कागल पोलिसात नेण्यात आले. त्यानंतर कागल येथील सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी नेण्यात आले. जखमी संदिप लोहार यांची जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.कानास गंभीर दुखापत झाल्याने 12 टाके घालण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी कागल पोलिस ठाणे येथे घडलेल्या घटनेची माहिती देवून संदिप लोहार यांनी बाळासो लोहार व अश्विणी लोहार यांनी रात्री घरावर हल्ला करून कोयत्याने माझ्यावर गंभीर वार केला असल्याची फिर्याद दिली. त्यानंतर संदिप लोहार यांना सायंकाळी पुन्हा चक्कर मारू लागली व रक्तदाब वाढल्याच्या कारणामुळे प्रकृती खालवली त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारासाठी  सी.पी.आर मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. कागल पोलिस ठाणेकडून संबधीत हल्लेखोर बाळासो लोहार आणि पत्नी यांच्या विरोधात तक्रार झाल्याने  त्यांना अटक करून त्यांच्यावर  कारवाई करणे अनिवार्य होते मात्र ती कारवाई झाली नाही.
तदनंतर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन संघटनेमार्फत शुक्रवार दिनांक 24 मे रोजी विविध दैनिकांचे 35 पत्रकार एकत्र येवून  कागलचे पोलिस ठाणे प्रमुख कुमार कदम यांना  भेटून संबधीत प्राणघातक हल्याची चर्चा केली. त्यांनी बाळासो लोहार याला तात्काळ अटक करण्याची ग्वाही दिली.मात्र अजूनही आठ दिवस  उलटून देखील त्यास अटक झालेली नाही. त्यामुळे कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे आम्ही पत्रकार संघाच्या वतीने  संदिप लोहारवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या बाळासो लोहार याला तात्काळ अटक करून योग्य ती कलमे लावून  त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी आम्ही लेखी निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत. 
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, कौन्सिल मेंबर प्रा.भास्कर चंदनशिवे, कौन्सिल मेंबर नंदकुमार कांबळे,जेष्ठ पत्रकार जहाँगीर शेख, जेष्ठ पत्रकार तानाजी पाटील, कागल शहराध्यक्ष कृष्णात कोरे,तालूका कार्याध्यक्ष सागर लोहार,उपाध्यक्ष संजय कांबळे, विक्रांत कोरे, फारूक मुल्ला, मनोज हेगडे, राजेंद्र पाटील आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी  लेखी निवेदनाच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र,जिल्हा पोलिस प्रमुख, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment