स्वच्छतेचे महत्व कळाल्याने महिलांचे जीवनमान उंचावले - विजयसिंह भोसले - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2019

स्वच्छतेचे महत्व कळाल्याने महिलांचे जीवनमान उंचावले - विजयसिंह भोसले

चंदगड येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात दिपप्रज्वलन करताना महिलावर्ग.
चंदगड / प्रतिनिधी
पूर्वीच्या काळी रांधा, वाढा, उष्टी काढा यामध्ये गुरफटून चूल आणि मूल यामध्येच अडकून पडल्या होत्या. स्त्रियांनी आपला संसार करायची पध्दत बदलली, मुली शिकल्या त्यामुळे त्यांच्या वैचारिक क्षमता वृंदावल्या. मुली असो किंवा महिला कमवू लागल्या आहे. चारचौघात वावरताना व आरोग्याच्या बाबतीत विचार करताना महिलांना आता स्वच्छतेचे महत्त्व कळले असल्याचे मत विजयसिंह भोसले यांनी विशेष मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले. पंचायत समिती सांस्कृतिक हॉलमध्ये महिलांसाठी “स्वच्छतेतून समृद्धीकडे "या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.                  
स्वागत सौ. शारदा काणेकर यांनी केले. प्रास्ताविक सौ. माधुरी सावंत-भोसले यांनी केले. श्री. भोसले पुढे म्हणाले, ``सध्याच्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहेत. अनेक उदाहरणे देवून महिलांना त्यांनी हसत-खेळत मार्गदर्शन केले.`` यावेळी चंदगडचे पोलिस निरिक्षक एस. एम. यादव, उद्योजक सुनील कणेकर, अॅड. विजय कडूकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. माधुरी सावंत-भोसले यांनी केले तर एस. के. ग्रुप चंदगड यांचे विशेष सहकार्य लाभले. यापुढे एस. के. ग्रुप चंदगड मार्फत अभिनव उपक्रम घेतले जातील असे उद्योजक सुनील काणेकर यांनी महिला मेळाव्यावेळी सांगितले. सौ. गीता कोकीतकर, करुणा चंदगडकर,  अनिता मांगले, नीता इंगवले,  दिपा गवस,  जमीन जमादार,  नीता परीट,  मॅरी सालदान, शोभा गवस यांच्यासह पाचशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. या  कार्यक्रमावेळी स्वच्छतेचा संदेश देणारी भेटवस्तू देण्यात आली. सूत्रसंचालन सौ. माधुरी सावंत-भोसले तर आभार सौ. स्वप्नाली गवस यांनी मानले. 

No comments:

Post a Comment