कालकुंद्री / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना (हेमरस ) मार्फत मंगळवार दिनांक 28 रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा तसेच शेती उपयोगी साधने व अवजारांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. युनिट हेड भरत कुंडल यांच्या अध्यक्षतेखाली संजय संचेती काउंटरी हेड ओलम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी साखर सहसंचालक सचिन रावल , जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकोरे, ऊस सल्लागार आर पी सिंग, प्रकल्प व्यवस्थापक मोहम्मद दिलशाद, तहसीलदार रणवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अरुण देशमुख यांचे ऊस ठिबक सिंचन , शास्त्रज्ञ एस बी माने यांचे कीड-रोग नियंत्रण विषयावर तर आबासाहेब साळुंखे यांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर व्याख्यान व मार्गदर्शन होणार आहे . तरी कार्यक्रमाला शेतकरी, ऊस उत्पादक बांधवांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन युनिट हेड भरत कुंडल, एच आर हेड जस्विर सिंह राखा, मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment