हंबीरे येथे विवाहीतेचा विहीरीत पडून मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2019

हंबीरे येथे विवाहीतेचा विहीरीत पडून मृत्यू


चंदगड / प्रतिनिधी
हंबीरे (ता. चंदगड) येथील सौ. अश्विनी जगदीश पाटील (वय-30) या विवाहितेचा विहीरीत पडून मृत्यू झाला. 21 ते 24 मे 2019 या दरम्यान हि घटना घडली. सौ. अश्विनी 21 मे रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या रात्री उशिरा घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. आज 24 मे सकाळी घराजवळील विहीरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची वर्दी जगदीश पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून हवालदार डी. एन. पाटील करीत आहेत.

No comments:

Post a Comment