कागलच्या संदिप लोहार यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अटक करण्याची को. डि. रि. वे. असोसिएशनची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2019

कागलच्या संदिप लोहार यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अटक करण्याची को. डि. रि. वे. असोसिएशनची मागणी


कागल / प्रतिनिधी 
साके ( ता. कागल) येथील पत्रकार सागर लोहार यांचे बंधू संदिप लोहार यांच्यावर सोमवारी रात्री कोयता या तीष्ण हत्याराने डाव्या कानावर वार करून जखमी केले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करावी. यासाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या पत्रकारांनी कागल पोलिस ठाणे प्रमुख एपीआय कुमार कदम यांना भेटून चर्चा केली. कुमार कदम यांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे ( दै. पुण्यनगरी)कौन्सील मेंबर नंदकुमार कांबळे ( बी. न्यूज), जेष्ठ पत्रकार तानाजी पाटील ( एस. न्यूज), माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र बोते  (दै. सकाळ), कागल शहराध्यक्ष कृष्णात कोरे(दै.महासत्ता) , जेष्ठ पत्रकार जहाँगीर शेख ( दै.  लोकमत), राजेंद्र पाटील ( दै. महान कार्य ), विक्रांत कोरे ( दै. तरूण भारत), जिल्हा संघटक अवधूत आठवले ( दै. पुण्यनगरी), जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे ( दै.सकाळ)कोर कमिटी मेंबर शशिकांत भोसले, तालुका उपाध्यक्ष विष्णूपंत इंगवले ( दै. महासत्ता), लक्ष्मण चावरे ( दै. पुढारी), के.जी. मुल्ला ( दै. पुण्यनगरी), जेष्ठ पत्रकार बाबासाहेब चिकोडे ( दै. लोकमत), कोर कमिटी मेंबर कृष्णात माळी  (दै. सकाळ), तालुका उपाध्यक्ष संजय कांबळे, फारूक मुल्ला ( दै. तरूण भारत), मनोज हेगडे ( दै. राष्ट्रगीत) अनिल पुजारी ( दै. महान कार्य), तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय वारके ( दै. सकाळ), माजगावकर ( दै. किर्तीवंत), तालुका संघटक रमेश पाटील ( दै. सकाळ) प्रकाश कारंडे ( दै महाराष्ट्र टाईम्स), अशोक ससे,( न्यायिक लढा), एन.एस. पाटील ( दै. पुढारी ), तानाजी पाटील ( दै. लोकमत), दत्ता पाटील ( दै. लोकमत), रवींद्र पाटील ( दै. पुढारी), संजय कांबळे  (दै. पुढारी) सम्राट सणगर  (संपादक गहिणीनाथ समाचार), तालुका सचिव समाधान म्हातुगडे  (संपादक लाईव्ह २४ तास) उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment