माडखोलकर महाविद्यालयातील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांनी 2018-19 च्या शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीत घवघवीत यश संपादन केले. करिष्मा दळवी, दशरथ कांबळे, सिद्धी सुतार, मनिषा वाळवे, विक्रम मुळीक, मनिषा हलगेकर या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने शिष्यवृत्तीचे धनादेश दिले आहेत. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द करुन विद्यार्थांचे अभिनंदन करण्यात आले. महाविदयालयाने सातत्यपुर्ण कामगिरी केली असून गुणवत्तापुर्ण कामगिरी होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यामुळेच हे यश प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी प्रा. डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. एस. के. सावंत, प्रा. डॉ. एस. डी. गोरल, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. डॉ. कमलाकर आर. ए. श्री. व्ही. ए. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment