पोलिस कल्याण निधी सप्ताहाचा समारोप - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2019

पोलिस कल्याण निधी सप्ताहाचा समारोप


चंदगड / अनिल धुपदाळे
जिल्हा पोलीस दलाच्या पोलिस कल्याण निधी सप्ताहाचा समारोप नुकताच झाला.या सप्ताहात पोलीस कल्याण निधी बाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस.महानिरीक्षक सुहास वारके होते.
प्रथम उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी केली. अप्पर पोलिस अधीक्षक तिथून तो काकडे यांनी पोलिसकल्याण निधीचा उपयोग कोण कोणत्या कामी होतो याची सविस्तर माहिती उपस्थित पोलिस व कुटुंबियाना देताना पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सामाजिक बांधिलकी राखून आदर्श निर्माण करावा असे सांगुन विविध उपक्रम,स्पर्धा,सामाजिक जाणीव,आपल्या जबाबदा-या,आणि कर्तव्य,नोकरी,उद्योगधंदे,विशेषता महिला पोलिस कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध योजना दिले जाणारी मदत.उधायोजगता कौशल्य विकास सहाय्य योजनांची माहिती व  आतापर्यंतच्या लाभार्थीची माहीती विशद केली.पोलीसाच्या पाल्याला उपलब्ध असलेल्या योजनांची माहितीही विशद केली.पोलिस वसाहतीत असलेला निटनेटकेपणा व स्वच्छता या बाबत या सप्ताहात झालेल्या स्पर्धेत इचलकरंजी पोलिस वसाहत,नविन पोलिस लाईन,पोलिस मुख्यालय व गडहिग्लज पोलीस लाईन या पोलिस वसाहतीना अनुक्रमे क्रमांक मिळाला.या वेळी विविध स्पर्धांमध्ये व परिक्षा गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात आला आला विभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र शेडे, प्रशांत अम्रुतकर,राजू शिंदे,या आधिका-यासह ईतर अधिकारी व कर्मचारी परिवारातील लोकांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment