चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीना इंटरनेट सुविधेने जोडण्यासाठी `महानेट` या नावाखाली चंदगड तालुक्यातील रस्त्याची बेकायदेशीर खुदाई केली जात आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या कामांची सुरवात केल्यामुळे रस्त्यावर मोठे अपघात होत आहेत. अधिकारी व ठेकेदाराने नियमावली बाजुला ठेवून कामे केल्यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. नियमबाह्य काम करणारे अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी गुन्हा नोंदवा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरिक्षक एस. एम. यादव यांना दिले आहे.
या खुदाई केलेल्या रस्त्यावर उन्हाळ्यात धुळ व आता पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवशांचे अपघात होत आहेत. वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊन ही अधिकारी वर्ग दुर्लक्ष केले आहे. त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भयंकर अपघात घडले आहेत. त्यामुळे संबंधीत जबाबदार अधिकारी व ठेकदार यांनी रस्त्याची बेकायदेशीर खुदाई करून ती भयंकर अपघात होतील अशा अवस्थेत ठेवल्याने अपघात होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे, अन्यथा प्रशासना विरोधात आंदोलन केले जाईल अशा इशारा ॲड. संतोष मळविकर यांनी पोलिस प्रशासनाला निवेदनातून दिला आहे. यावेळी माजी सरपंच रुपेश आनगुडे, शशिकांत पाटील, महादेव गावडे, सुभाष जाधव, अनिल गावडे, परशराम मळविक यांच्यासह प्रवाशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment