कालकुंद्री (ता. चंदगड) परिसरातील एक शेतकरी कुळव व फळी घेऊन सर्जा-राजाच्या सहाय्याने शेतीच्या मशागतीसाठी जाताना. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे काहीशा सुस्त झालेल्या बळीराज्याच्या अंगात उत्साह संचारला असून शेती कामांनी वेग घेतला आहे. हे चित्र चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात दिसत आहे.
उन्हाळ्यात नेहमी तीन-चार वेळा बरसणाऱ्या वळीवाने यावर्षी पूर्णपणे फिरवली त्यामुळे खरीप पेरणीपूर्व मशागत खोळंबल्या होत्या .चार महिने विविध यात्रा, साखरपुडा, लग्न समारंभात हरवलेला बळीराजा दोन दिवसात मेघगर्जनेसह काही प्रमाणात बरसलेल्या मृगाच्या पहिल्या पावसाने खडबडून जागा झाला आहे. सर्जा राजाच्या जोडी सह मिळतील ती अवजारे व बांधबंदिस्ती साठी कुटुंबातील सदस्यांना घेऊन शिवाराच्या दिशेने धावताना दिसत आहे. दरवर्षी बैलजोडी ,ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने दोन चार कुळवणी करून मृगनक्षत्र पूर्वी पेरणीची तयारी व्हायची. अनेक शेतकरी धुळवाफ पेरण्या पूर्ण करायचे मात्र यावर्षी धुळवाफ पेरण्या अपवादानेच दिसतात.कर्यात भागातील पंधरा-वीस गावे भाताचे कोठार समजले जातात तथापि मृगाला तीन दिवस झाले तरी कालकुंद्री, कोवाड, निटुर, कुदनुर, किणी, कागणी सारख्या मोठ्या गावात धूळवाफ पेरणीचा अजून शुभारंभी दिसत नाही. पेरणीसाठी पारंपारिक व संकरित भातांच्या वाणांची बेगमी करून बळीराजा पुरेशा पर्जन्य राज्याची वाट पाहताना दिसत आहे .मात्र सद्यस्थितीत पेरणीपूर्व मशागतींच्या कामात गुंतला आहे.
No comments:
Post a Comment