बेळगाव रहिवाशी संघटनेच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी गुणपत्रिका पाठविण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2019

बेळगाव रहिवाशी संघटनेच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी गुणपत्रिका पाठविण्याचे आवाहन


बेळगाव / प्रतिनिधी
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खानापूर तालुक्यातील बेळगाव रहिवासी असलेल्या दहावी व बारावीमधील गुणी विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी दहावी व बारावीत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी 30 जून पर्यंत आपल्या गुण पत्रिकेची प्रत मेन रोड वडगाव येथील पी. जे. घाडी यांचे एलआयसी कार्यालय किंवा मिलेनियम गार्डन जवळील हॉलिडे स्टोअर इंडिया (प्रतीक गुरव) येथे आणून द्यावीत असे कळविण्यात आले आहे. गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचाही निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अध्यक्ष पी. जे. घाडी यांच्याशी 09845374648 किंवा मिलिंद देसाई 07760688710  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केेले आहे. 

No comments:

Post a Comment