पर्यावरण संवर्धनातील मानव महत्त्वाचा घटक -जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2019

पर्यावरण संवर्धनातील मानव महत्त्वाचा घटक -जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे

प्राथमिक शिक्षक बाबुराव वरपे यांनी रोपे वाटप केली. त्याप्रसंगी उपस्थित जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व इतर
माणगांव / प्रतिनिधी
जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्य मानवच करू शकतो असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी व्यक्त केले. चंदगड तालुक्यातील डुक्‍करवाडी येथील वृक्षप्रेमी प्राथमिक शिक्षक बाबुराव वरपे यांच्या मोफत रोपवाटिका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
 आज जागतिक तापमान वाढीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा विळखा निर्माण झाला आहे .पर्यावरणाचा -हास यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन तापमान वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्याचे खरे कार्य वृक्षच करतात. दरवर्षी शासनाने वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य केले आहे .यासाठी मानवाची भूमिका ही महत्त्वाची असून प्रत्येक मानवाने आपापल्यापरीने वृक्षलागवड करून पर्यावरण  संवर्धनाचे काम केले पाहिजे असे मत जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी व्यक्त केले.चंदगड तालुक्यातील डुक्‍करवाडी येथील वृक्षप्रेमी प्राथमिक शिक्षक बाबुराव वरपे हे गेली पंचवीस वर्षे दरवर्षी दोन हजार रोपांची लागवड करुन मोफत वाटप करतात. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत वृक्षप्रेमी बाबूराव वरपे यांनी केल्यानंतर पाटणे वनविभागाचे वनपाल दत्तात्रय पाटील, केंद्र प्रमुख एम.टी.कांबळे ,गाव कामगार तलाठी विठ्ठल शिवणगेकर , प्राध्यापक प्रकाश बोकडे, महादेव शिवणगेकर यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली . यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मोफत काजू ,आंबा, फणस व मसालेदार वनस्पतींचे वाटप करण्यात आले.
 महाराष्ट्र शासनाचा  सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अटल पणन पुरस्कार जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना प्राप्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सरपंच  राजू शिवणगेकर  यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत वृक्ष लागवड अधिकारी वाय .व्हि.पाटील ,वनपाल अमोल शिंदे , राणबा  ढेरे,  तानाजी कांबळे,अशोक पाटील, नामदेव गावडे, दत्तु वरपे, अमृत निकम ,विलास सुतार, रामचंद्र गावडे, म्हातारु घोळसे,  शारदा वरपे आदी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment