चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कळसगादे येथील धनगरवाडा गेली पाच-सहा दिवस वीज नसल्याने अंधारात आहे. वीज गायब असल्याने रात्रीच्या वेळी लोकांत भिंतीचे वातावरण निर्माण झालेआहे. कळसगादे या गावापासून काही अंतरावर असलेल्या धनगरवाड्यामध्ये गेली पाच -सहा दिवस वीज नसल्याने वास्तव्याचे असलेल्या लोकांत भितीचे वातावरणनिर्माण झाले आहे. जंगलात असलेल्या या धनगरवाड्यामध्ये कधीही हत्ती, वाघ, गवे येवू शकतात. धनगरवाड्यामध्ये रात्र झाली की चिमणीच्सया दिव्यावर लोक रात्र काढत आहेत. महावितरण कडून वेलीच दखल घेवुन वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी धनगरवाडा शिवसेना शाखा प्रमुख बाबुराव लांबोर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment