कोवाडला निर्भया पथकाकडून वाहनधारकावर कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2019

कोवाडला निर्भया पथकाकडून वाहनधारकावर कारवाई

कोवाड (ता. चंदगड) येथे दुचाकी वाहनांची तपासणी करताना निर्भया पथक.
तेऊरवाडी / प्रतिनिधी 
कोवाड (ता. चंदगड) येथे कोवाड -माणगाव रस्त्यावर  नियमबाहय बेफामपणे वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वारावर निर्भया पथकाने धडक कारवाई करून दंड वसूल केला. आज दुपारी कोवाड- निटटूर दरम्यान निर्भया पथकातील पोलीसांनी अचानक दुचाकी तपासणी मोहिम चालू केली. यामध्ये 15 दुचाकीस्वाराकडून 3000 रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये वेगाने गाडी चालवणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, वाहतूक परवाना नसणे अशा वाहनधारकाकडून दंड वसूल करण्यात आला. वरील कारणामुळे अनेकांचे अपघात झाले असून समोरुन येणाऱ्यांना अनेकांनी ठोकरल्याने अपघात घडले आहेत. त्यामुळे चंदगड पोलिसांनी हि मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्याची गरज आहे. No comments:

Post a Comment