दाटे येथे बुधवारी खासदार मंडलिक यांच्या आभार मेळ्याव्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2019

दाटे येथे बुधवारी खासदार मंडलिक यांच्या आभार मेळ्याव्याचे आयोजन

नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभेचे नुतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा चंदगड तालुका आभार मेळावा दाटे (ता. चंदगड) येथे बुधवारी 12 जून 2019 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केल्याची माहीती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली. या मेळाव्याला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे, विधानसभा संघटक संग्राम कुपेकर, केडीडीसीसीचे संचालक राजेश पाटील, भाजपा नेते गोपाळराव पाटील, उपसंघटक संभाजी पाटील, सुरेशराव चव्हाण-पाटील, राजेंद्र परीट, अड. संतोष मळविकर, संभाजीराव देसाई-शिरोलीकर, तालुका प्रमुख अनिल दळवी, अशोक मनवाडकर, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा महिला संघटक सौ. संज्योती मळविकर, जी. बी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment