चंदगड / प्रतिनिधी
राज्यातील सर्व माजी जि. प,. पं. स व ग्रा. प सदस्यांना तसेच अठ्ठावन वर्षावरील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मासिक पेन्शन योजना सुरू करावी. यासह अन्य मागण्यासाठी चंदगड तहसीलदार कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य माजी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच कल्याणकारी संघटनेच्या वतीने चंदगड, आजरा व गडहिंग्लज विभागाच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वयाची 58 वर्षे पूर्ण झालेल्या शेतकरी, व्यापारी, नागरिकांना दरमहा सहा हजार रुपये मासिक पेन्शनह मिळावी. माजी मंत्री, आमदार यांना ज्या प्रमाणे मासिक पेन्शन मिळते. त्याप्रमाणे ग्रा. प. सदस्य, प. स. सदस्य तसेच जि. प. सदस्य यांनाही मासिक सहा हजार रुपये पेन्शन मिळावी. अठरा ते पस्तीस वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना महीना बेकार भत्ता मिळाला. चंदगड, आजरा व गडहिंग्लज या ठिकाणी उद्योग धंदे उभारणीसाठी एम. आय. डी. सी. मध्ये बेरोजगारांना शासकीय नियमानुसार प्रत्येकी दहा गुंडे जागा द्यावी. दुधाला दर वाढवून द्यावा. लोकसेवा आयोगा मार्फत प्राध्यापकाची नियुक्ती करावी. सरसकट कर्ज माफी मिळावी, राज्यातील सर्व सरपंचाना एस. टी. बस पास मोफत मिळावा. महिनेटच्या केबलसाठी बेकायदेशीर रस्त्यात खोदकाम करणाऱ्या कंपनीकडून रस्त्याचे काम पूर्ववत करून घेण्यात यावे. इत्यादी मागणीचे निवेदन नुकताच चंदगड तहसीलदार यांना देण्यातआले. या निवेदनावर भैरू सुरंगे, बाजीराव होडगे, शिवप्रसाद तेली, रणजीत देसाई, मारूती बुवा, नामदेव गावडे, रघुनाथ पाटील, रावसाहेब पाटील इत्यादीच्या सह्या आहेत.


No comments:
Post a Comment