साठ वर्षावरील नागरिकांना पेन्शन द्यावी, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तहसिलवर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2019

साठ वर्षावरील नागरिकांना पेन्शन द्यावी, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तहसिलवर मोर्चा

साठ वर्षे पुर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन द्यावी. या मागणीसाठी चंदगड बाजारपेठेतून मोर्चा काढताना प्रहार अपंग संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी. 
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील साठ वर्षे  वयाच्या महिला व पुरूषांना सरकारी पेन्शन योजना सुरू करावी. शेतकरी, कामगार यांनाही सरसकट हि योजना लागु करावी, या मागणीसाठी सोमवारी जोतिबा गोरल यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तहसीलदार कार्यालयावर अपंग क्रांती संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. रखरखत्या भर उन्हात तालुक्यातील शंभराव्या प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चातील लोकांनी शहरातुन विविध मागण्यासाठी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. शेतकरी, कामगार, साठ वर्ष वय पुर्ण झालेल्या सर्व स्त्री-पुरुषाना सरकारी पेन्शनयोजना सुरू करा. आमदार, खासदार पेन्शन मिळते. मात्र सामान्य माणसाला का नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. पेन्शनमुळे त्यांना वृद्धावस्थेत आधार होईल. यासाठी हा मोर्चा काढून सरकारकडे ही मागणी करत असल्याचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना दिले आहे. 

No comments:

Post a Comment