चंदगड शहरात पाऊस झाल्याने नागरीकांनी पहिल्यांदाच वर्षभर ठेवलेल्या छत्र्या बाहेर काढून पावसातून मार्गक्रमण केले. |
शहरासह परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारी चार वाजल्यानंतर अर्धा तास रिमझिम पाऊस पडत होता. पाऊस मोठा नसल्यामुळे अनेकांनी दुचाकीवरुन व चालत पावसातून भिजतच मार्गक्रमण केले. आज सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. मात्र पावसाला सुरवात झाल्यानंतर वातावरणात गारठा जाणावत होता. सायंकाळपर्यंत हा गारठा कायम होता. त्यामुळे मान्सुनच्या पावसाची चाहुल लागली आहे. चार दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्याच्या कर्यात भागात धुळवाफ पेरणीला प्रारंभ झाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातही शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतले आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती वरुणराजाच्या आगमनाची. सर्वांचेच डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. मान्सुनच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.
No comments:
Post a Comment