आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर |
सातवणे (ता. चंदगड) येथे वादळी पावसाने विजेचे पोल मोडल्यामुळे शेती पंप व पोल्ट्रीचा खंडित झालेला वीज पुरवठा तातडीने सुरू करावा. अशी मागणी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडगाव रोड गडहिंग्लज कार्यकारी अभियंता श्री. भोये यांच्याकडे करुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाचाही वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी बांधव हे हवालदिल झालेले आहेत. या खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा शेती व पोल्ट्रीचा व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना भेटून बऱ्याच वेळा विनंती केली. परंतु अद्याप वीज पुरवठा सुरू झालेला नाही. ही बाब योग्य वाटत नाही. आज चंदगड येथील बैठकी मधून कार्यकारी अभियंता गडहिंग्लज श्री. भोये यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली आहे. या विषयाची गांभीर्याने नोंद घ्यावी. अन्यथा शेतकरी बांधव नाईलाजास्तव नजीकच्या काही दिवसात वीजपुरवठा सुरू न झाल्यास उपोषणा करण्याच्या तयारीत आहेत. तरी तातडीने याबाबत कार्यवाही करून खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करून झालेल्या कार्यवाहीचा अहवाल अवगत करावे अशा विनंतीचे पत्र आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी विद्युत कंपनीला दिले आहे.
No comments:
Post a Comment