चंदगड / प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता. राहून-राहून सरीवर सरी कोसळत होत्या. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु आहे. हा पाऊस रोपलावणीसाठी उपयुक्त ठरल्याने आज दिवसभर शिवार माणसांनी फुलून गेले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील मृदा लाल रंगाची असल्याने या मातीसाठी जास्त पावसाची गरज असते. आज दिवसभर चांगला पाऊस झाल्याने रोपलावण करणाऱ्या शेतकऱ्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी 27.83 मिमी तर आतापर्यंत 1135.16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरात सर्वांधिक पाऊस माणगाव परिसरात 45 तर सर्वात कमी पाऊस कर्याद भागातील कोवाड येथे 13 मिलीमीटर झाला आहे. या पावसामुळे शेतीकामांना वेग आला असून शेतकरी सुखावला आहे.
No comments:
Post a Comment