![]() |
शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवलेल्या साईराज भादवणकर चा सत्कार करताना राजेश पाटील |
अडकूर / प्रतिनिधी
येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये विविध परिक्षामध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालूका संघाचे संचालक अभय देसाई होते . तर प्रमूख पाहूणे म्हणून गोकूळ संचालक व नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव राजेश पाटील उपस्थित होते .
यानंतर एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षामध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सुरज पाटील , मारूती पाटील , सायली आपटेकर ( इयत्ता आठवी ) , इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवलेला साईराज भादवणकर , नवोदय विद्यालय कागल ला निवड झाल्याबद्दल नम्रता शिंदे या विद्यार्थ्यांचा राजेश पाटील , अभयबाबा देसाई , सरपंच यशोधा कांबळे , प्राचार्य डि .जी. कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अध्यापक एस .एन . पाडले , एस .के. पाटील , पी .के. पाटील, महेश गुरव, एस .डी. कांबळे यांचाही गौरव करण्यात आला .विद्यार्थांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळा आणी पालकानी एकत्रीत पणे प्रयत्न करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत मानव घडण्याचे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे विचार यावेळी बोलताना राजेश पाटील यानी व्यक्त केले . अभय देसाई , डी.जी. कांबळे यानी मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमाला सरपंच यशोधा कांबळे , गडहिंग्लज बाजार समिती अध्यक्ष गोविंद सावंत , बाळाराम नाईक यांच्यासह पालक , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक पी .के. पाटील यांनी केले . सूत्रसंचालन रविंद्र देसाई यानी तर आभार एस.के. हरेर यानी मानले.
No comments:
Post a Comment