बुगडीकट्टी शाळेला भाजपचे रमेश रेडेकर यांच्याकडून वाॅटर फिल्टर प्लांट भेट - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2019

बुगडीकट्टी शाळेला भाजपचे रमेश रेडेकर यांच्याकडून वाॅटर फिल्टर प्लांट भेट

बुगडीकट्टे (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेला भाजपा नेते रमेशराव रेडेकर यांच्याकडून आर. ओ. वॉटर फिल्टर भेट
चंदगड / प्रतिनिधी
विद्यामंदिर बुगडीकट्टे (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेला भाजपा नेते रमेशराव रेडेकर  यांनी शाळेतील मुलांना  स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळावे यासाठी रुपये २२०००/- किंमतीचा आर. ओ. वॉटर फिल्टर  प्लांट भेट दिला.  प्रथम मुख्याध्यापक यादव यांनी मान्यवरांचे स्वागत करुन परिश्चय करुन दिला. यावेळी  बोलताना रमेशराव रेडेकर म्हणाले, निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची गरज आहे.पावसाळ्यात दुषीत पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरतात.मुलांना पालकांनी घरी उकळून थंड केलेले पाणी द्यावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगलताई रुद्रापा देसाई होत्या. यावेळी बाळकर दांपत्य, डॉ.  के. आय. सत्तेगिरी, जोतीबा हुबळे, मारुती बाळकर, आप्पासाहेब पाटील, कामाना नाईक,  ग्रा. प. सदस्य मायाप्पा धनगर, रामलिंग दुध्यापगोळ, महेश कांबळे,  संजय पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक यादव  यांनी आभार व्यक्त केले.



No comments:

Post a Comment