जोर ओसरला, चार बंधारे अद्यापही पाण्याखालीच, घरांच्या पडझडीमुळे 1 लाख 85 हजारांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2019

जोर ओसरला, चार बंधारे अद्यापही पाण्याखालीच, घरांच्या पडझडीमुळे 1 लाख 85 हजारांचे नुकसान


चंदगड / प्रतिनिधी
शहर परिसरात आज दिवसभर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तरीही आज दुसऱ्या दिवशीही कानडी, कोनेवाडी, हल्लारवाडी व करंजगाव हे चार बंधारे आजही पाण्याखालीच राहिले. अतिवृष्टीमुळे तालुक्यात विविध ठिकाणी सात घरांच्या भिंतींची पडझड होवून 1 लाख 85 हजारांचे नुकसान झाले. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात तालुक्यात सरासरी 29.5मिमी तर आतापर्यंत 1430.16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
अतिवृष्टीमुळे मौजे चन्नेहट्टी येथील कल्लापा लगमा दवलटी यांच्या घराची भिंत कोसळून 25000 चे, मौजे चन्नेहट्टी येथील लगमा व्हळयाप्पा अंगडी यांच्या घराची भिंत कोसळून 55000 चे, मौजे चन्नेहट्टी येथील शट्यापा बसापा नाईक यांच्या घराची भिंत कोसळून 30000 चे, मौजे कुदनूर येथील पुंडलिक मारुती ओऊळकर यांच्या घराची भिंत कोसळून 25000 चे, मौजे कारवे येथील जगदीश सुबराव दुकळे यांच्या जनावराच्या गोठ्याची भिंत कोसळून 10000 चे, मौजे तेउरवाडी येथील भागुबाई मोहन लोहार यांच्या घराची भिंत कोसळून 10000 चे, मौजे किणी येथील रंजना विठ्ठल गनाचारी यांच्या घराची भिंत कोसळून 20000 चे, मौजे हिंडगाव येथील पार्वती महादेव कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून 10000 चे नुकसान झाले आहे. या सर्व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उद्यापर्यंत सर्व मार्ग सुरळीत होणार आहे. तालुक्यात सर्वांधिक पाऊस हेरे -43मिमी (2381) व सर्वांत कमी पाऊस कोवाड -18मिमी (568) परिसरात झाला आहे. तालुक्यातील पारगड, इसापूर, सुंडी, तिलारी, तुडये परिसरातील सर्व धबधबे मुसळधार पावसामुळे कार्यन्वीत झाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे.  

No comments:

Post a Comment