चंदगड नगरपंचायत बिनविरोध की दुरंगी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी, बैठकांना जोर - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2019

चंदगड नगरपंचायत बिनविरोध की दुरंगी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी, बैठकांना जोर


नंदकुमार ढेरे / चंदगड प्रतिनिधी 
          नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून चंदगडचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या नगरपंचायतीचा नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यास अनेक इच्छूक उमेदवार तयार असून उमेदवारी फायनल करताना नेत्यांना बंडखोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. भाजप विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी अशी लढत होणार असल्याचे आजचे चित्र असले तरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच चंदगडच्या मतदारांची मागणी आहे. ही निवडणू बिनविरोध व्हावी यासाठी एक गट कार्यरत आहे.
             चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यास सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे. भाजपातुन तर निवडणूक लढवण्यास भाऊगर्दी आहे. त्यामुळे उमेदवारी देताना गटनेत्यांना बंडखोरी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. जागा वाटप योग्य प्रकारे न झाल्यास उमेदवारी न मिळालेल्या असंतुष्ट इच्छूक उमेदवार विरोधी गटातुन निवडणूक लढवतील. ग्रामपंचायतीवर सत्ता असलेला माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांचा प्रबळ गट भाजप मध्ये समाविष्ठ झाल्याने याठिकाणी भाजपची ताकत वाढली आहे.  भाजप, शिवसेना युती विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे. तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी असाही एक गट आपली भुमिका मांडताना दिसत आहे. भाजप गटवार बैठका घेतांना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या गटात मात्र हालचाली दिसत नाहीत. 
       नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने नगराध्यक्ष पदाचा पहिला मान मिळवण्यासाठी इच्छूक उमेदवारांची मोठी गर्दी आहे. प्राची दयानंद काणेकर, स्वरा सचिन बल्लाळ, माजी सरपंच सुजाता सुरेश सातवणेकर, समृध्दी सुनिल काणेकर व शोभा मल्लिकार्जुन वांटगी, आदी उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. या निवडणूकीत एकुण 7757 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 3947 पुरुष व 3820 महिला मतदारांचा समावेश आहे.   
  
                       चंदगड शहरातील मतदारसंख्या वार्डप्रमाणे व आरक्षण
प्रभाग क्र.
स्त्री
पुरुष
एकूण
आरक्षण
1
224
242
466
सर्वसाधारण पुरुष
2
215
220
435
सर्वसाधारण पुरुष
3
178
218
396
ना. मा. प्रवर्ग महिला
4
157
162
319
सर्वसाधारण महिला
5
240
299
539
सर्वसाधारण पुरुष
6
264
271
535
सर्वसाधारण पुरुष
7
216
220
436
अ. जा. महिला
8
219
228
437
ना. मा. प्रवर्ग पुरुष
9
185
181
366
सर्वसाधारण महिला
10
257
255
512
ना. मा. प्रवर्ग महिला
11
173
164
337
ना. मा. प्रवर्ग पुरुष
12
308
316
624
सर्वसाधारण पुरुष
13
164
183
377
सर्वसाधारण महिला
14
250
241
491
सर्वसाधारण पुरुष
15
260
244
504
सर्वसाधारण महिला
16
243
264
507
सर्वसाधारण महिला
17
237
239
476
ना. मा. प्रवर्ग महिला
एकूण
3820
3947
7757

नंदकुमार ढेरे, चंदगड / प्रतिनिधी





No comments:

Post a Comment