कालकुंद्रीच्या सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2019

कालकुंद्रीच्या सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात

मदतीच्या साहित्यासह कालकुंद्री विद्यालयाचे अध्यापक व विद्यार्थी.
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या प्रलयंकारी अतिहवृष्टी व महापुरामुळे बाधित बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा केले. शाळा व्यवस्थापन समिती, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या परीने मदत जमा करून जमा झालेली सुमारे अठरा हजार रुपये रक्कम पूर बाधित राजगोळी, कालकुंद्री, होसुर, बुकिहाळ  या गावामध्ये   तेथील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन या मदतीचे वाटप केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सी बी निर्मळकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील, शाळा समिती सदस्य जी एस पाटील, एन के पाटील, रा ना पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी नाईक,  विनायक कांबळे, संगीता पाटील, अर्चना मंगुरकर आदींची उपस्थिती होती. उपक्रमाबद्दल शाळा व विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.
No comments:

Post a Comment