![]() |
कडकनाथ संबंधितावर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देताना नितीन पाटील, प्रभाकर खांडेकर व इतर. |
चंदगड तालुक्यातील अनेकांनी "कडकनाथ"कोंबडी पालन व्यवसायात
मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवणूक करून मोठ्या आशेने हा व्यवसाय सुरु केला होता.
मात्र प्रमुखांनी घाशा गुंडाळल्याने आता पोल्ट्री चालकाना मोठा फटका बसला आहे. संबंधितावर
कडक कारवाई करावी अशी मागणी चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांना चंदगड तालुक्यातील
पोल्ट्री व्यावसायिकांनी निवेदनातून केली आहे.
"कडकनाथ"
कोंबडी व्यवसायात चंदगड तालुक्यातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली
आणि व्यवसाय थाटला. या कोंबड्या व त्यांची अंडी खरेदी तसेच खाद्य पुरवठा याबाबत
अनभिज्ञता स्पष्ट झाल्यावर तालुक्यातील अनेक व्यवसाईक अडचणीत आले आहेत. आज चंदगड
तालुक्यातील अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी तहसील कार्यालयात तहसीलदार विनोद रणावरे
या़ची भेट घेऊन कैफियत मांडत निवेदन दिले. बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांनी संबंधितांवर
र त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment