तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री नरसिंह हायस्कूल निट्टूरच्या विद्यार्थ्यांचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2019

तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री नरसिंह हायस्कूल निट्टूरच्या विद्यार्थ्यांचे यश


तेऊरवाडी / प्रतिनिधी
दुंडगे हायस्कूल दुंडगे (ता. चंदगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री नरसिंह हायस्कूल निट्टूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध गटामध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धामध्ये पुढील विद्यार्थी यशस्वी झाले.
मोठा गटामध्ये साहिल परशराम नेसरकर (71 किलो), प्रथम क्रमांक, ज्ञानेश्वर आण्णाप्पा पाटील     (80 किलो) प्रथम क्रमांक,  लहान गट शुभम बहिर्जी पाटील (35 किलो) प्रथम क्रमांक, ज्ञानेश्वर देवानंद पाटील (38 किलो) द्वितीय क्रमांक, नरसु शिवाजी नाईक (41 किलो) द्वितीय क्रमांक, मुबारक इमाम मुल्ला (48 किलो) द्वितीय क्रमांक, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत  यश मिळवलेल्या या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. देसाई,  एस. एम. पाटील, क्रीडा शिक्षक आय. वाय. गावडे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment