स्वामी प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2019

स्वामी प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

चंदगड येथील कन्या प्राथमिक शाळेत स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी भापजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, संगायोचे अध्यक्ष सुनिल काणेकर, समीर पिणळणकर व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
ठाणे येथील स्वामी प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने चंदगड तालुक्यातील चंदगड येथील कन्या व कुमार तसेच अडकूर येथील शिवशक्ती हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना बिस्कीटे, वह्यांसह अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. 

कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात पुराने थैमान घातल्याने घरे पडून अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. शिवारातील पिक पुराच्या पाण्यामुळे कुजून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान होवून शेतकरी देशोधडीला लागला. या पुरकाळात स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्तांना जीवनोपयोगी वस्तुचे गावोगोवी जाऊन वाटप करण्यात आले. 
काही गावात जाण्यासाठी रस्ता नसतानाही अडचणीतून जावून लोकांना मदत करण्यात आली. यावेळी कोनेवाडी (ता. चंदगड) येथे पुराने पडलेली घरांची पाहणी करताना सायंकाळच्या वेळी चिखलात पाय घसरुन पडल्याने श्री. पाटील यांच्या पायाला दुखापत झाली. तातडीने त्यांना बेळगाव येथे हलवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

पायाला प्लॅस्टर बांधून पुरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेवून त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी न थांबता संपुर्ण तालुक्याचा दौरा केला. यावेळी पडझड झालेल्या घरांची पाहणी करुन लोकांना धीर देण्याबरोबरच वस्तु स्वरुपातही मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे पुरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. यावेळी श्री. पाटील यांच्या समवेत भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, संगायोचे तालुकाध्यक्ष सुनिल काणेकर, समीर पिळणकर,  नवीद अत्तार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. No comments:

Post a Comment