पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोकुळकडून मुख्यमंञी सहाय्यता निधीस ५१ लाखाचा निधी |
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ लि., कोल्हापूर (गोकुळ) दुध संघामार्फत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंञी सहाय्यता निधीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे त्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी गोकुळचे चेअरमन मा.श्री. रविंद्र आपटे यांनी सुपूर्द केला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार मा.श्री. धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पूर परीस्थितीमध्ये गोकुळ दुध संघ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभा राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्त गावांना संघामार्फत पशुखाद्य, दुध, व पशुवैद्यकीय सेवा तातडीने पुरविण्यात आल्या. संघामार्फत देणेत आलेल्या या मदतीमध्ये गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचा-यांचा एक दिवसाचा पगार १९,७५,०००/- (एकोणीस लाख पंच्यात्तर हजार) व गोकुळ दुध संघामार्फत ३१,२५,०००/-(एकतीस लाख पंचवीस हजार) असा एकूण एकावन्न लाख रुपये रक्कमेचा धनादेश मुख्यमंञी सहाय्यता निधीस देणेत आला. यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री. विश्वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, संचालक विश्वास जाधव, बाबा देसाई व मुंबई येथील वाशी शाखेचे शाखा प्रमुख श्री. दयानंद पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment