कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षणतज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांची जयंती, शिक्षक दिन व दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
प्रतिमापूजन केंद्रप्रमुख व शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम समृद्धी पर्व निरीक्षक वाय आर निटूरकर यांच्या हस्ते झाले. स्वागत मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी केले. प्रास्ताविक गणपती लोहार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकरदादा खांडेकर यांनी उपस्थित राहून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना पक्षाच्यावतीने शाळेतील पूरग्रस्त सर्व १३५ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व प्रत्येकी अर्धा डझन वह्या व लेखन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर. उपतालुकाप्रमुख दत्ता पाटील व किरण कोकितकर, विभाग प्रमुख विनोद पाटील, शाखाप्रमुख सदानंद वांद्रे (कोवाड) व परशुराम मुरकुटे (नागरदळे) आदींची उपस्थिती होती. शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन व जे पी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला. शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिवसभर शिक्षकांची भूमिका पार पाडली. त्यांना अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, उज्वला नेसरकर, कविता पाटील, मधुमती गावस यांचे मार्गदर्शन लाभले.आभार भावना आतवाडकर यांनी मानले. कोवाड केंद्रांतर्गत विद्या मंदिर चिंचणे, कामेवाडी, दुंडगे, तेऊरवाडी, घुलेवाडी, मलतवाडी, निटूर,किणी,जक्कनहट्टी आदी शाळेतूनही शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment