![]() |
इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे फौजी प्रवासी बस थांब्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी रमेशराव रेडेकर व कार्यकर्ते. |
चंदगड / प्रतिनिधी
इब्राहिमपू र (ता.चंदगड) येथे भाजपा नेते रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते "फौजी प्रवासी बस थांब्याचा" लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत होते.
फौजी बस थांबा उभारण्यासाठी गावातील युवा प्रतिष्ठान,युवा संघर्ष, फौजी मित्र मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या व मागण्या भाजपा नेते रमेशराव रेडेकर यांच्याकडे मांडल्या.आपल्या मनोगतात रमेशराव रेडेकर म्हणाले, गावातील श्री महादेव देवस्थानला "क" वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी मी सदैव ग्रामस्थांबरोबर आहे.त्याचबरोबर इब्राहिमपुर धनगरवाडा येथे मे २०१९ मध्ये आपण स्वखर्चाने बोअर खुदाई करुन तेथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हातभार लावल्याचे रेडेकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाला सरपंच सौ.रुपाली सावंत,माजी सरपंच सौ.संजिवनी हरेर, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,संजय रेडेकर,मल्हार शिंदे,संजय पाटील, युवराज जाधव,अमृत केसरकर,कुमार पाटील,सुनील नांगरे,विकास तुपट, अजित ओऊळकर,मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत व आभार सुरेश हरेर यांनी मानले.
No comments:
Post a Comment